ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा

देशावर कोरोनाचं सावट आहे. लॉकडाऊन असल्याने सर्व जनता घरीच आहे. रामजन्मोत्सवावरही कोरोनाचं सावट आहेच. नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात अवघ्या 5 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
मंदिराच्या गाभार्यात महंत सुधीर पुजारी , नरेश शास्त्री पुजारी यांनी यंदाचे उत्सवाचे मानकरी हर्षल बुवा पुजारी यांना उत्सवाची पूजा सांगितली. यंदा पहिल्यांदाच उत्सवात मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना उत्सव साजरा करण्यात आला.
मंदिराच्या गर्भगृहात ढोल ,झांज यांच्या तालावर आणि पुष्पांची उधळण करत उत्साहात रामजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी मंदिराच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळाला.
दरम्यान आज सकाळपासून विविध पक्षांच्या नेत्यांनी रामजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.