या पावसाळी रानभाज्या तुम्हाला माहिती आहेत का?
जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली
गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात नुकताच जांभूळ आणि रानभाजी महोत्सव घेण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रकारच्या भाज्या या महोत्सवात विक्रीसाठी आल्या होत्या.
सहसा वापरात न येणाऱ्या शेवगाचे पाने, अरतफची पाने, कडू भाजी, पातूरची भाजी अशा वेगवेगल्या 32 प्रकारच्या भाज्यांचा यात समावेश होता. तसंच महिलांना जांभळपासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचे धडे देण्यात आले.
खरंतर पावसाळा आला की भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे महागाईने मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांची जास्तच कंबरमोड होते. पण या महोत्सवामुळे गडचिरोलीकरांना विविध भाज्या माफक दरात घेता आल्या.