उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकावं, कंगना रानौतच्या बहिणीचं Tweet

कोरोनाचं संकट देशावर असताना महाराष्ट्र सरकार सातत्याने जनतेला कोरोनापासून बचाव करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिची आपल्या बेफाम Tweets साठी ओळखली जाणारी बहीण रंगोली चंडेल हिने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकण्याची गरज आहे, असं रंगोली चंडेल हिने ट्विट करून म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हॉस्पिटलमध्ये १०,००० खोल्या रुग्णांच्या उपचारांसाठी तयार ठेवल्या आहेत. एवढंच नव्हे, तर हॉटेलमध्ये १०,००० खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचंच उदाहरण देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत.