Thu. Nov 26th, 2020

देशासह राज्यभरात धुलीवंदनाचा उत्साह

राज्यासह देशात धुलीवंदनाचा आनंद लुटला जात आहे. धुलीवंदनाचा पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी तसेच राजकीय नेत्यांनी देशवासियांना धुलीवंदनाचा शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई पोलिसांना होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने ट्विट केलंय.

होळी हा रंगांचा सण आहे. रंगांच्या माध्यमातुन आनंदाची उधळण करताना स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.

आम्ही #Dial100 आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. सर्वांना होळी व धुलिवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळीच्या शुभेच्छा. होळीचा आनंद लुटताना स्वत:ची काळजी घ्या. कोरोनापासून वाचून रहा, असं ट्विट केजरीवाल यांनी केलंय.

दरम्यान भारतात कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून गर्दी करु नये, असं आवाहन जनतेला करण्यात आलंय.

दरवर्षी होळीचा सण साजरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी मात्र होळीच्या खेळापासून दूर राहणार आहेत.

कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, यासाठी होळीच्या कार्यक्रमात पण सहभागी होणार नसल्याचं पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

म्हणून पंतप्रधान यंदा खेळणार नाहीत रंग

तसंच लोकांनीही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं, असा सल्ला नरेंद्र मोदींनी दिले आहेत.

होळी हा आपल्या सर्वांचा आवडीचा सण आहे. तसेच होळीनंतर येणारे धुलीवंदन आणि रंगपंचमी म्हणजे मनसोक्त रंगाची उधळण असते. पण आपण सध्या कोरोना बद्दल ऐकूनच आहोत.

मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी जनतेला ‘या’बाबतीत केलं आवाहन

अनेकदा हे रंग चीन वरून येतात. त्यामुळे शंकेला वाव नको म्हणून यावर्षी आपण हा रंगाचा सण रंगाऐवजी गुलालाची उधळण करून खेळू यात, असं आवाहन बाळा नांदगावकरांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *