Sat. Feb 27th, 2021

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपात प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जसंजसं जवळ येत आहेत तसं तसं राजकीय हालचालींना वेग येत आहे. लोकसभा निवडणुकांत उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते पक्ष बदलताना दिसत आहे. कॉंग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांंचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर इतर नेतेही पक्ष बदलण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे कल्बमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख उपस्थित आहेत.

भाजप प्रवेशाचं नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांच्या हिताच्या ‘कृष्णा भीमा योजने’ची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थट्टा केली.

ही योजना करायची असेल तर भाजपच करू शकते.

त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला.

सत्ता, पद यासाठी हा पक्षप्रवेश नाही.

शेती आणि पाण्याची कामं गतीने व्हावीत यासाठी पक्षप्रवेश आहे.

बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे दुपारी साडेबारा वाजता पक्षप्रवेश होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य भाजप नेते उपस्थित राहणार असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

आपल्याला भाजप मध्ये जाण्यापासून कोणी ही रोखले नाही, की कोणाचाही फोन आला नाही.

पुढच्या काळात पक्ष कोणती जबाबदारी देईल ती पार पाडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे त्यांनी या वेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *