Mon. Jul 13th, 2020

29 व्या ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रणजित पटेलची बाजी…

21 किलो मीटर च्या मुख्यस्पर्धेत नाशिकच्या रणजित पटेल यांनी प्रथम येऊन बाजी मारली असून हि स्पर्धा जिंकली तर दीपक कुंभार दुसरे विजेते आणि संतोष पाटील हे तिसरे विजेते ठरले आहेत.

क्रीडा क्षेत्रात सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी 29 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मोठय़ा उत्साहात संपन्न होत असून नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास 21 हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी असल्याचा दावा महापालिकेने केला.

यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धक प्लॉस्टिक मुक्तीच्या संदेशासोबतच अवयदानाबाबतही जनजागृती करण्यात आली.

गेली 28 वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंचे आकर्षण ठरली आहे. गेली 28 वर्ष सातत्याने वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणारी ठाणे महापालिका भारतातील एकमेव महापालिका आहे.

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अवयदानाची चळवळ व्यापक स्वरुपात समाजात पोहचावी यासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचे 350 डॉक्टर्स सहभागी होणार असून अवयदानाबाबत जनजागृती करत आहेत. या ठाणे मॅरेथॉनच्या स्पर्धेत रणजित पटेल याने बाजी मारलेली आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली. पारितोषिक वितरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांनी प्लॉस्टिक मुक्तीच्या संदेशासोबतच अवयवदानाबाबतही जनजागृती केली.

’मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेवून स्पर्धक यंदा मॅरेथॉनमध्ये धावले. विविध अकरा गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण रक्कम रु 7,02,000/- बक्षीसे ठेवण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *