रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा BJP मध्ये प्रवेश

माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची डोकेदुखी कमी होताना दिसत नाही, एकापाठोपाठ तीन धक्के राष्ट्रवादीला बसले असून सुरवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या उमेदवारीबाबतीत यु-टर्न घेतला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला.
यानंतर काँग्रसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीपुढे फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार म्हणून मोठे आव्हान असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील,विनोद तावडे,सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.
कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?
रणजितसिंह यांना सव्वा दोन महिन्यापूर्वी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले होते.
स्वराज दूध संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय ताकद वाढवली.
रणजितसिंह यांचे वडील हिंदुराव शिवसेनेचे माजी खासदार होते.
फलटण नगरपालिकेत रणजित सिंह यांच्या पुढाकारात नऊ नगरसेवक निवडून आले होते. सातारा जिल्हा परिषदेत त्यांचा एक सदस्यही आहे.
दरम्यान सव्वा दोन महिन्यापूर्वी काँग्रेसने मोठ्या विश्वासाने रणजितसिंह यांना सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केले होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रणजितसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे निंबाळकर यांचे कट्टर विरोधक आहेत.