Sat. Oct 24th, 2020

धक्कादायक! रॅन्समवेअरमुळे 56 कोटी लोकांचे वैयक्तिक ई-मेल आणि पासवर्ड लीक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जगभरात रॅन्समवेअर व्हायरसनं धुमाकूळ घातलेला असताना 56 कोटी लोकांचे वैयक्तिक ईमेल आणि पासवर्ड़ लीक झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. 10 प्रसिद्ध वेबसाईटवरून युझर्सची माहिती हॅकर्सन चोरल्याचं क्रामटेक सिक्युरिटी रिसर्चर सेंटरनं म्हटलं.

 

जीमेल, याहू, लिंक्डइन, ड्रापबॉक्स, लास्ट एफएम, मायस्पेस, अडोब, नेओपेट्स, टुम्ब्लर आणि इतर वेबसाइटच्या माध्यमातून हॅक करण्यात आलेत. त्यामुळे ईमेलचे पासवर्ड तात्काळ बदलण्याची सूचना करण्यात आली.

 

आपला ईमेल हॅक झालाय की नाही हे कळण्यासाठी क्रामटेक सिक्युरिटी रिसर्चर सेंटरनं एक वेबसाइटही तयार केली आहे. Have I Been Pwned या वेबसाइटवर तुम्ही तुमचा यूझर्स नेम किंवा ईमेल आयडी टाकल्यास तुम्हाला तुमचा पासवर्ड हॅक झाल्याची माहिती मिळणार आहे.

 

तसंच कोणत्या वेबसाइटद्वारे तुमचे पासवर्ड हॅक करण्यात आलेत, त्या वेबसाइटचीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली. या वेबसाइटवरून डेटाबेस चोरलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही, मात्र संशोधकांनी त्या हॅकर्सला ‘एडी’ असं नाव दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *