Tue. Nov 24th, 2020

बलात्कार केल्याचा राग ठेऊन पिडीतेच्या नातेवाईकांनी दिला चोप अन्…

राज्यात अत्याचारांच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान नुकतीच अकोल्यातील अत्याचाराची बातमी समोर आली आहे.

अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील राजू गणपत सोनवणे याने 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. राजू गणपत सोनवणे या नराधमाने अत्याचार करून बलात्कार केल्याचा राग मनात धरून पीडित महिलेच्या नातेवाईकांनी संगनमत करून बलात्कार करणाऱ्यास जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील आदिवासी भागांमधील शिरपुंजे येथील महिला आपली जनावरे चारण्यासाठी जायनेवाडी गावच्या शिवारातील खारेबा माळावर मंगळवारी सकाळी गेली होती. तेथे आरोपी राजू गणपत सोनवणे यांने या महिलेवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करून बलात्कार केला व जंगलात पळून गेला.

अशी फिर्याद राजूर पोलिसांत ५५ वर्षीय पिडीत महिलेने दिली होती. राजूर पोलिसांनी आरोपी राजू गणपत सोनवणे यांच्या विरोधात भा.द.वी. कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच शिरपुंजे येथील पोलीस पाटील रंगनाथ काळू धिंदळे यांनी राजूर पोलिसांत फिर्यादीनुसार, मंगळवारी राजू गणपत सोनवणे यांनी शिरपुंजे येथील 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याने सदर गोष्टीचा मनात राग धरून पिडीत महिलेचे नातेवाईक आरोपी विजय सुधाकर तपासे ,अक्षय संजय तपासे, योगेश उर्फ महेंद्र अशोक तपासे यांनी शिरपुंजे गावात आरोपी राजू सोनवणे यास दुपारच्या तीन वाजल्याच्या सुमारास जबर मारहाण केल्याने त्याला मार लागल्याने तो मयत झाला.

अशी फिर्याद राजूर पोलिसांत दिल्याने आरोपी विजय सुधाकर तपासे, अक्षय संजय तपासे, योगेश उर्फ महेंद्र अशोक तपासे यांच्या विरोधात भा.द.वी. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा राजूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास स.पो.नि.नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक नितिन खैरनार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *