CPI (M) च्या कार्यालयातच युवतीवर बलात्कार?

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) म्हणजेच CPI (M)च्या केरळ येथील स्थानिक कार्यालयात एका विद्यार्थी नेत्याने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका 21 वर्षीय तरुणीने केली आहे. केरळमध्ये CPI(M)चीच सत्ता असल्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या शनिवारी पोलिसांना रस्त्यात एक नुकतंच जन्मलेलं अर्भक सापडलं होतं.
या बाळाच्या आईचा पत्त शोधून काढण्यात आला.
तेव्हा या नवजात अर्भकाची आई अवघ्या 21 वर्षांची कॉलेज विद्यार्थिनी असल्याचं निष्पन्न झालं.
चौकशी केल्यावर दहा महिन्यांपूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याचं आणि त्यातूनच हे आपत्य जन्मल्याचं या पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलं.
कॉलेजच्या मॅगझिनसंदर्भात ही तरूणी CPI(M)च्या पक्ष कार्यालयात गेली होती.
त्यावेळी तेथील विद्यार्थी नेत्याने तिच्यावर बलात्कार केला, असं या तरुणीचं म्हणणं आहे.
CPI(M) कडून प्रतिक्रिया
आरोप करणारी महिला आणि तिचं कुटुंब SFI चे कार्यकर्ते आहेत.
जर पक्ष कार्यालयातच अशी घटना घडली असेल, तर आम्ही त्याची चौकशी करू.
पोलीसांनीच सत्य शोधून काढावं, असं CPI(M) च्या नेत्याने म्हटलंय.
काँग्रेसनेही या गोष्टीवरून CPI(M) ला लक्ष्य केलंय. CPI(M)चं कार्यालय हा बलात्काराचा अड्डा बनल्याचा आरोप त्यांनी केलाय.