Jaimaharashtra news

नगरमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून गर्भपात

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

नगरमध्ये पोलिसानंच तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे, तर पीडितेला गर्भपात करण्यासही भाग पाडलं. त्यानंतरही तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार करत घरी बोलावून तिला मारहाण केली.

 

 

पीडितेनं तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, आरोपी गणेश अकोलकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश हा व्हिआयपींचा सुरक्षारक्षक असल्याची माहिती मिळते. अविवाहित असल्याचं सांगत त्यानं तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.

 

 

गर्भ राहिल्यानंतर विवाहित असल्याचं सांगत त्यानं लग्नाला नकार दिला. तिला गर्भपात करण्यास सांगितलं. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. आणि पत्नी, भावजयच्या मदतीनं तिला मारहाण केली.

Exit mobile version