Wed. Dec 8th, 2021

वडिलांना मारायची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने पळवून नेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बीड शहर हादरून गेलंय. चार मित्रांच्या मदतीने आरोपीने हे दुष्कृत्य केल्याचं पीडितेने सांगितलंय. पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा आहेत. तिच्यासोबत घडलेल्या अत्याचारामुळे शाळेत गेलेल्या मुली सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

काय घडलं पीडित मुलीबरोबर?

शाळेत जाताना काही गुंड सतत छेड काढत असल्यामुळे पीडित मुलीचं शिक्षण वडिलांनी बंद केलं होतं.

मात्र शाळा बदलून पाहू म्हणत वडिलांनी दुसऱ्या शाळेत टाकलं.

पण त्या ठिकाणीही आरोपीने वारंवार छेड काढली.

‘तू मला भेटत जा, नाहीतर तुझ्या भावाला किडनॅप करू, तुझे वडील कोणत्या रस्त्याने जातात- येतात माहिती आहे. त्यांना संपवून टाकू’, अशा धमक्या आरोपीने पीडितेला दिली.

तसंच दोन दिवसांपूर्वी पीडित मुलगी शाळेत गेली असता आरोपीने मित्राच्या मदतीने मुलीला धमकावून बळजबरीने गाडीवर बसवून बाहेर नेलं.

जीवे मारण्याची धमकी देत निर्जन रस्त्याने आरोपीच्या गावातील बंद बंगल्यात नेत बलात्कार केला.

यावेळी या पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली.

त्यावेळी आरोपीच्या मित्रांनी व नातेवाईकांनी पीडितेला पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करत पळ काढला.

या पीडितेच्या शरीरावर जखमा आहेत.

या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र प्रथमदर्शी आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे. लहान वयात गंभीर गुन्हेगारी कडे मुळे वळतात हे अत्यंत गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *