मेगाभरती सुरूच; EVMला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करा – मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये इनकमिंग सुरू असून मेगाभरती अद्याप बंद झालेली नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेवर असून वर्ध्यात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच निवडून आल्यानंतर येत्या 5 वर्षात राज्याला दुष्काळमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेवर असून आज महाजनादेश यात्रेचा दुसरा दिवस आहे.
वर्ध्यात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्लाबोल केला.
विदर्भात एकही प्रकल्प नाही जिथे काम सुरू नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच सिंचनाची सर्वाधिक सुविधा विदर्भात केली.
येत्या 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
EVMला दोष देण्याएवजी आत्मचिंतन करावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
गेल्या 5 वर्षात केलेल्या कामामुळे यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
EVM वर अविश्वास म्हणजे जनतेवर अविश्वास असेही त्यांनी म्हणाले.