Mon. Jan 17th, 2022

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा

रविकांत तुपकर यांनी अखेर राजू शेट्टींची साथ सोडली आहे. स्वाभिमानी प्रदेशाध्यक्षपदाचा तुपकरांनी राजीनामा दिला आहे. तसंच बुलढाण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून पुढचा निर्णय़ घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रविकांत तुपकर यांनी अखेर राजू शेट्टींची साथ सोडली आहे. स्वाभिमानी प्रदेशाध्यक्षपदाचा तुपकरांनी राजीनामा दिला आहे. तसंच बुलढाण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून पुढचा निर्णय़ घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे तुपकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तसंच चिखली मतदारसंघावर दावा ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर सदाभाऊ खोतनंतर स्वाभिमानी पक्षाला दुसरा मोठा धक्का बसल्याच बोललं जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी घटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांना पत्र पाठवून राजीनाम्याचं सांगीतलं आहे. “मी बऱ्याच वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम केले. यामुळे माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे” असे या पत्रात म्हटलं आहे.

तुपकर संघटना सोडून गेल्याने राजू शेट्टींना व्यक्तिगत मोठा धक्का बसल्याचे बोललं जात आहे. सदाभाऊ खोत गेल्यानंतर तुपकर हे स्वाभिमानीचा प्रमुख चेहरा होता. निवडणूक,आंदोलनांची मोर्चेबांधणी तुपकर एकहाती करायचे . बुलडाणा आणि पश्चिम विदर्भातील पक्ष संघटना कमजोर होण्याची शक्यता आहे. तुपकरांच्या माध्यमातून भाजपला एक युवा,शेतकरी चळवळीचा चेहरा मिळेल तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांचा चिखली हा विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *