Sat. Nov 28th, 2020

रवींद्र गायकवाडांनी अखेर एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

 

शिवसेनेचे उस्मानाबादचे मारकुटे खासदार रवींद्र गायकवाडांनी अखेर एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला. हवाई प्रवासावरील बंदी हटवल्यानंतर खासदारांनी हैदराबाद ते दिल्ली असा बिझनेस क्लासमधून गुरुवारी प्रवास केला.

 

बिझनेस क्लासचे तिकीट असतानाही इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले म्हणून 23 मार्चला त्यांनी एअर इंडिया ग्राऊंड स्टाफला चपलेने मारहाण केली होती. या कृत्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घातली होती.

 

खासदार गायकवाडांचा नो फ्लाय लिस्ट यादीत समावेश केला होता. आपल्या वर्तनाबद्दल गायकवाडांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांच्याकडे खेद व्यक्त केल्यानंतर त्यांच्या हवाई प्रवासावरील बंदी हटवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *