Wed. Jan 20th, 2021

RBIने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली

8 नोव्हेंबर 2016 साली नोटबंदी झाल्यानंतर देशात 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. मात्र आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई आता थांबवल्याची माहिती समोर आली आहे. या आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नसल्याचे आरबीआयने सांगितले आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आरबीआयने ही माहिती दिली आहे.

2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली –

केंद्र सरकारने 2016 साली नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला.
संपूर्ण देशात एका रात्रीत 500 आणि 1000 च्या नोटा बाद केल्याने नागरिकांच्या मनात खळबळ माजली होती.
काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्याकरीता 500 आणि 1000 रुपयांची नोट चलनातून बाद केल्याचे समजते आहे.
2000 रुपयांची नोट चलनात आणल्यामुळे नागरिकांनी प्रचंड टीका केली आहे.
त्याचबरोबर 2000 रुपयांच्या नोटांमुळे सुट्ट्या पैशांची समस्याही वाढली होती.
मात्र आरबीआयने आता 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *