Thu. Oct 22nd, 2020

एकदा चार्ज केल्यानंतर 8 दिवस फोन चार्ज करण्याची गरजच नाही; ‘रेडमी 5A’लाँच

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

एक दोन दिवस नव्हे तर तब्बल आठ दिवसांचा बॅटरी बॅकअप असलेला फोन शाओमीने लाँच केला आहे.

‘रेडमी 5A’ असे या फोनचे नाव आहे. हा स्मार्टफोन ‘रेडमी 4A’चा अॅडव्हान्स मॉडेल असेल. मेटल बॉडी असणारा हा स्मार्टफोन 137 ग्रॅम वजनाचा आहे.

चीनमधील मोबाईल बाजारात शाओमीने ‘रेडमी 5A’ स्मार्टफोन 599 युआनमध्ये (सुमारे 6000 रुपये) आणला आहे.

 

 ‘रेडमी 5A’ स्मार्टफोनचे बेस्ट फीचर्स :

– 5 इंची स्क्रीन

– 720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन

– 4GHz क्वाड कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर

– 2 जीबी रॅम

– 16 जीबी मेमरी128 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा

– 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

– 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

– 3000 mAh क्षमतेची बॅटरी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *