Wed. Mar 3rd, 2021

दिवाळीच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा……

परतीच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्याचे नुकसान केलं आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. शेवटी याबाबतीत निर्णय झाला झाला आहे. 

दिवाळीच्या आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  माहिती दिली आहे. राज्यात परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला.  पीक ही काढणीवर आलेली होती मात्र पावसामुळे पिकं भुईसपाट झाली होती.अनेक भागात तर पिकंच वाहून गेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्याना सांगितली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. शेवटी त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *