Tue. Mar 2nd, 2021

रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेन रूग्णालयात उपचार

remo dsouza suffers heart attack

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रेमो डिसूझा सध्या 46 वर्षाचे आहेत. त्यांच्यावर अॅजिओप्लास्टी करण्यात आली आहे. एका वेबपोर्टलने यासंबंधी माहिती दिली आहे.

रेमो डिसूझा यांनी 1995 साली आपल्या करिअरची सुरूवात केली. रेमो यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सूरु केली. अनेक सुपरहिट गाण्यासाठी त्यांनी कोरिओग्राफी केली. मात्र, त्यानंतर त्यांनी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरुवात केली. स्ट्रीट डान्सर, एबीसीडी, एबीसीडी 2, फ्लाईंग जठ, आशा काही सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. याशिवाय काही डान्स रिअलिटी शोचचं परीक्षण त्यांनी केलं आहे. यात डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस आणि झलक दिखला जा यासारख्या डान्स शोजचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *