Thu. Dec 2nd, 2021

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन

मराठीतील प्रख्यात कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. सतीश काळसेकर हे ७८ वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका असून काळसेकर यांच्या निधनामुळे नवोदित लेखक, कवींचा हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत.
वेंगुर्ल्यातील काळसे या गावात काळसेकर यांचा जन्म झाला . सिंधुदुर्गातच त्याचं शालेय शिक्षण झालं तर मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी ज्ञानदूत व टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. काळसेकर यांची काव्य लेखनातून वाङ्‌मयीन कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रातून कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला . या कविता संग्रहानं त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली.
कवी सतीश काळसेकर यांची साहित्य संपदा इंद्रियोपनिषद् (१९७१), साक्षात (१९८२), विलंबित (१९९७) हे कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आले. तसेच त्यांनी अनेक कवितासंग्रहांचे मराठी अनुवादही केले. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या त्यांच्या पुस्तकाला २०१४ सालच्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सतीश काळसेकर यांच्या कवितांचा समावेश अनेक महत्त्वाच्या संकलनात झाला आहे. हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी, पंजाबी यासह अन्य भारतीय भाषांत त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत. त्यांनी देशी-विदेशी भाषांतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. महाश्वेता देवी आणि रस्किन बाँण्ड यांच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *