Sun. Jan 24th, 2021

तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच – रेणुका शहाणे

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.‘चौकीदार चोर है’, या राहुल गांधींच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘मै भी चौकीदार’ही नवी प्रचार मोहीम सोशल मीडियावर राबवली आहे.भाजप नेत्यांकडून या मोहीमेला पाठिंबा दिला आहे.तर विरोधी पक्ष यावर टिका करताना दिसत आहे.या मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांना अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कडाडून टीका केली आहे.तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच असा टोला त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाल्या रेणुका शहाणे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार या मोहिमेला पाठिंबा देताना मला अभिमान वाटत आहे. असं ट्विट एम.जे अकबर यांनी केले.

भारताचा नागरिक म्हणून मी देशांतील भ्रष्ट्राचार, दहशतवाद, गरिबी दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन’असही एम.जे अकबर यांनी म्हटलं आहे.

रेणुका शहाणे यांनी एम. जे अकबर यांच ट्विट रिट्विट करत तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितचं अशी टीका केली आहे.

२०१८ मध्ये सुरू झालेल्या #metoo मोहिमेअर्तंगत अनेक पत्रकार महिलांनी एम. जे अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.

एम. जे अकबर यांना या आरोपांमुळे ऑक्टोबर २०१८ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *