Mon. Mar 8th, 2021

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी मुंबई येथील त्यांच्या घरातून त अटक केली आहे. त्यानंतर पोलिसाकडून मारहाण झाली असल्याचे स्वतः अर्णब गोस्वामी यांनी सांगितलं आहे. तसेच, त्यांचे वकील गौरव पारकर यांनी देखील पोलिसांवर गंभीर आरोप केला. अर्णबला अलिबाग न्यायालयात हजर केलं आहे. यामुळे भाजपा नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे.

अर्णब गोस्वामीच्या अटकेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. चंद्रकांत दादानीही ठाकरे सरकार कडाडून टीका केली आहे तर औरंगाबादमध्ये भाजपाचे रास्तारोको आंदोलन झाले आहे. यादरम्यान शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी टीकेला उत्तर दिलं असून अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपाच्या मुंबई  प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी१९७४ साली इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने देशात आणीबाणी जाहीर केली, तेव्हा शिवसेनेनं त्याचं समर्थन केलं होतं. शिवसेनेनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या दबावाखाली येऊन सूडबुद्धीनं कारवाई करत आहे.  संविधानरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवणारे सर्वजण आज मात्र गप्प बसले आहेत,” अशी टीका शेलार यांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *