Fri. Feb 21st, 2020

चिकन तंदुरीचे पैसे मागितले;पोलिसांचा हॉटेल मालकाला त्रास

हॉटेलमध्ये चिकन तंदुरी खाल्यानंतर पोलिसांकडे पैसे मागितल्यामुळे हॉटेल मालकाला वारंवार त्रास देत असल्याची घटना कल्याण येथे घडली आहे. हॉटेल मालकाचे नाव सुर्वे असे असून कल्याणला त्यांचे हॉटेल आहे. कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस त्रास देत असल्याचे सुर्वे यांनी सांगितले आहे.

नेमकं काय घडलं ?

काही दिवसांपूर्वी सुर्वे यांच्या हॉटेलमध्ये काही पोलीस चिकन तंदुरी खाण्यासाठी आले होते.

त्यानंतर सुर्वे यांनी पोलिसांकडे ऑर्डरचे पैसे मागितले.

पैसे मागितल्यामुळे पोलिसांना त्यांचा राग आला. त्यामुळे पोलीस वारंवार त्रास देत असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या जीआरनुसार खाद्यगृहे रात्री दीड वाजेपर्यंत उघडी ठेवायला परवानगी आहे.

मात्र रात्री 12 वाजताच्या सुमारास पोलीस हॉटेलमध्ये येऊन हॉटेल बंद करण्यास सांगतात.

तसेच सुर्वे यांच्या मुलाला मारहाण करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

मात्र तरीही पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला असून सुर्वे यांच्याकडे महापालिका परवाना नसल्याने आम्ही कारवाई करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याप्रकरणी पोलिसांवर कारवाई झाली नाही तर पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा सुर्वे यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *