Fri. Dec 3rd, 2021

स्मिता पारीखने केले रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आली अनेक अभिनेत्रींनी आणि अभिनेत्यांनी तिच्यावर गंभीर आरोप केले होते. आता रियाला पुन्हा एका स्मिता पारीखने तिला धारेवर धरले आहे. सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण स्मिता पारीखने टि्वटरद्वारे माहिती दिली की, रिया आणि आदित्य रॉय कपूर हे रिलेशनमध्ये होते आणि ‘रियाला जाणूनबुजून सुशांतच्या आयुष्यात आणलं गेलं होतं. रिया २०१२ पासून २०१४ पर्यंत आदित्य सोबत रिलेशनमध्ये होती. शिवाय त्यांचं खूप वाईट प्रकारे ब्रेकअप झालं होतं.’ परंतु, त्यांनी आजपर्यंत कधीही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केला नाही.असा गंभीर आरोप केला आहे.

सुशांतच्या मृत्यूला कारण असल्याचा ठपका हा रियावर ठेवला गेला आहे. कोर्टाचा निर्णय काहीही असला तरीही सुशांतचे चाहते तिला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार मानतात. आता कुठे रियाच्या अडचणी कमी झाल्या असं मानलं जात होतं. मात्र पुन्हा एकादा रियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रियाने तिच्या ‘सोनाली केबल’ चित्रपटात अली फजलला किस करायला नकार दिला होता. मात्र जेव्हा आदित्यने ‘आशिकी २’ मध्ये श्रद्धा कपूरला किस केलं तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी तिने चित्रपटात किसिंग सीन दिला होता. त्यावेळेस आदित्य आणि श्रद्धा यांच्या नात्याच्या खूप चर्चा होत्या.

रियासोबत ब्रेकअप नंतरही आदित्य तिच्यावर खूप प्रेम करायचा. असं म्हटलं जातं की, तो अजूनही रियासाठी पझेसिव्ह आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रियाचे फोन कॉल तपासले होते. तेव्हा आदित्य आणि रिया अजूनही एकमेकांच्या संपर्कात असल्याचं कळलं होतं. मात्र, आता त्यांच्यात गर्लफ्रेण्ड- बॉयफ्रेण्डचं नातं नसून ते एकमेकांचे मित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *