Thu. Apr 22nd, 2021

रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ!

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला काही महिन्यांपूर्वी एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर उजेडात आलेल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवुडमधील अनेक मोठी नावं समोर आले यानंतर Narcotics Control Bureau आणखी चौकशी सुरू केली.

रिया चक्रवर्ती हीला सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. शेवटी रियाचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर देखील अडचणीत आहे. Narcotics Control Bureau अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने रिया चक्रवर्तीच्या जामिनाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येत्या १८ मार्च रोजी NCBच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवाय काही महिन्यापूर्वी एनसीबीनं मुंबई विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये ३३ आरोपींची नावं समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये रिया आणि तिच्या भावाचं शौविक चक्रवर्तीचं देखील नाव आहे. तब्बल ११ हजार ७०० पानांच्या या चार्जशीटमध्ये जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज, गोळा करण्यात आलेले पुरावे, आत्तापर्यंत झालेला तपास या सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. चार्जशीटमधील एकूण आरोपींपैकी ८ जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत.

काही दिवसापूर्वी वर्षी जून महिन्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. झालेल्या काही तपासामधून काही सत्य बाहेर आले यात ड्रग्ज कनेक्शन असल्याचं तपासातून समोर आलं यानंतर हा तपास एनसीबीनं सुरू केला. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सुशांतसिंह राजपूतच्या कर्मचारी वर्गापैकी काही आणि बॉलिवुडमधील इतर काही व्यक्तींमध्ये झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तपास सुरू केला होता. या चॅटमध्ये अनेक बॉलिवुडमधील मोठमोठी नावं समोर आली याप्रकरणावर आणखी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *