Tue. Mar 31st, 2020

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आज शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला आहे.

त्यांची लढत थेट राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याशी होणार आहे. राम शिंदे हे गेल्या 2 टर्ममधून या मतदारसंघात विजयी झालेले आहेत.  मात्र आता रोहित पवार यांच्या रूपाने यावेळेस त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

कर्जत शहरातील आकाई देवी इथून वाजत गाजत मिरवणूक काढून रोहित पवार यांनी तहसील कार्यालय येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात कोणतीही विकास कामे झालेली नसून या ठिकाणी फक्त जातीपातीचे आणि गटातटाचे राजकारण होत आहे. त्यामुळे आता यापुढे फक्त विकास हाच अजेंडा घेऊन मी निवडणुकीला सामोरे जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *