Tue. Sep 28th, 2021

पवार कुटुंबाचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील – रोहीत पवार

काल घडलेल्या घडामोडीनंतर रोहित पवार यांनी संपुर्ण पवार कुटूंबाचा एकत्रित असलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून पवार कुटुंब एकत्र असल्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

काल घडलेल्या घडामोडीनंतर रोहित पवार यांनी संपुर्ण पवार कुटूंबाचा एकत्रित असलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून पवार कुटुंब एकत्र असल्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे.

काय म्हणाले रोहीत पवार?

तुमच्या आमच्यांपैकी जो कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो , त्याने आपल्या कुटुंबावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगी जी प्रतिक्रिया दिली असती तितकीच प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणजे आदरणीय अजित दादांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा.

माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा , सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असत ? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात.

मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन कि , पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊदे पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे. की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील . मी मागे पण सांगितलं आहे कि अजिबात कशाची काळजी करू नका , आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील.असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया. अशा आशयाची फेसबूक पोस्ट केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *