Wed. Dec 8th, 2021

वन डे सामन्यात डबल सेंच्युरी मारत रचला नवा विश्वविक्रम; लग्नाची अॅनव्हर्सरी बनली स्पेशल

वृत्तसंस्था, मुंबई

 

मोहाली वन डे सामन्यात टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने खणखणीत द्विशतक ठोकून नवा विश्वविक्रम रचत श्रीलंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहितचं हे कारकिर्दीतील तिसरं द्विशतक ठरलं.

रोहितने 151 चेंडूत द्विशतक झळकावलं. या सामन्यात रोहित शर्माने 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले.

रोहित शर्मा हा द्विशतक ठोकणारा पहिला कर्णधार, तर वन डेत तीन द्विशतक ठोकणारा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.

विशेष म्हणजे आज रोहितच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे आजचा दिवस खास ठरला आहे. त्याची पत्नी देखील स्टेडीयमवर उपस्थितय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *