Sat. Jun 6th, 2020

हिटमॅन रोहित शर्माचे शतकी खेळीसह अनेक रेकॉर्ड

विशाखापट्टणम : रोहित शर्माने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये धमाकेदार खेळी केली. रोहितने 159 धावांसह शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 16 फोर आणि 5 सिक्स लगावले.याखेळीसह रोहितने अनेक रेकॉर्ड केले आहेत.

एका वर्षात सर्वाधिक शतकं

विंडिज विरुद्धातील रोहितचं आजचं शतक हे 2019 या वर्षातील 7 वं शतक ठरलं. यासोबतच रोहितने एका वर्षात सर्वाधिक शतक करण्याच्या बाबतीत सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. एका वर्षात सर्वाधिक शतकं करण्याची कामगिरी सचिन तेंडुलकरने केली आहे. सचिनने 98 साली सर्वाधिक म्हणजेच 9 शतकं केली होती.

सर्वाधिक सिक्स

रोहितने विंडिज विरुद्धच्या आजच्या दुसऱ्या वनडेमध्ये 5 सिक्स लगावले. यासह रोहित शर्माचे यावर्षात एकूण 77 सिक्स झाले आहेत. यासोबतच रोहित 2019 वर्षात सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू ठरला आहे. रोहितने 2018 साली 74 सिक्स लगावले होते.

विंडिज विरुद्धातील रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधील २८ वे शतक ठरले. यासह रोहितने शतकांच्या बाबतीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची बरोबरी केली.

रोहितने 33 वी धाव घेताच 2019 वर्षातील 1300 धावा पूर्ण केल्या. रोहितने या वर्षात 27 वनडे मॅच खेळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *