Sat. Jan 16th, 2021

रोहित वेमुला प्रकरणी स्मृती इराणी आणि भाजप नेत्याला क्लीन चीट

वृत्तसंस्था, हैद्राबाद

 

हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येमुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश सरकारला द्यावे लागले होते. या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला.

 

रोहित वेमुलाने आत्महत्या काही कारणांमुळे आलेल्या नैराश्यामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे केली होती असं या अहवालमध्ये म्हटलं. रोहित वेमुला आणि त्याच्या 4 मित्रांची विद्यापीठाच्या हॉस्टेलमधून हकालपट्टी केल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

तसंच रोहित वेमुलावर दबाव आणल्याचा आरोप असलेल्या माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजप नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही न्यायालयीन समितीने क्लीन चीट देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *