Fri. Sep 30th, 2022

#RoseDay: जाणून घ्या गुलाबाच्या रंगांमध्ये दडलेलं ‘हे’ सुंदर रहस्य!

प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर भावना असते.

आपल्या प्रेमासाठी आपण काहीही करण्यास तयार असतो पण जेव्हा आपल्याला आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते तेव्हा आपण काही तर वेगळं आणि स्पेशल करण्याचा विचार करतो.

त्यातच जर आपल्याला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंनटाईन डे हा दिवस मिळाला तर आपल्यासाठी सर्वात सुंदर दिवसच असं प्रत्येकाला वाटतं.

फेब्रिवारी हा महिना प्रेमाचा गुलाबी महिना म्हणून ओळखला जातो आणि या महिन्यात व्हॅलेंनटाईन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारीला जर तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करण्याचा विचार केला असेल तर याची सुरूवात आजपासूनच करा…

आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे. येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाईल.

आज या दिवसाची सुरूवात ही रोज डे ने झाली आहे.

आजच्या दिवशी फुलं देऊन प्रेम व्यक्त करतात. आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सर्वात चांगली आणि सोपी पद्धत आहे.

पण अनेकांना कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय अर्थ असतो हेच माहीत नसतं. चला तर जाणून घेऊया प्रत्येक रंगामध्ये दडलेलं सुंदर रहस्य…

लाल गुलाब – प्रेमाचं प्रतिक

या गुलाबाच्या फुलाचा प्रेम दर्शवणारा सर्वात कॉमन रंग आहे. लाल गुलाब हा रोमान्स, पॅशन आणि इंटेन्स इमोशनशी संबंधित मानला जातो.

हा गुलाब देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे हे व्यक्त करता की, तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. म्हणजे I Love You  म्हणण्याचा हा शॉर्टकट आहे.

पिवळा गुलाब – आभार व्यक्त करणे

पिवळ्या रंगाचा गुलाब हा मैत्रीसाठी वापरला जातो. कारण पिवळा रंग हा जोशपूर्ण, तजेलदार आणि उत्साह देणारा मानला जातो.

सोबतच पिवळा रंग हा आनंद आणि चांगल्या आरोग्याचा प्रतिकही मानला जातो. तसेच वेंलेटाईन मध्ये प्रेमीयुगुलांनाच नव्हे, तर आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना, आई-वडिलांना, नातेवाईकांना ही पिवळा गुलाब देऊन त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करू शकतो. त्यांचे आभार व्यक्त करू शकतो.

पांढरा गुलाब – शांततेचं प्रतिक

जर तुमचं तुमच्या एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी जोरदार भांडण झालं असेल. पण आता हे भांडण विसरून तुम्हाला पुन्हा नातं जोडायचं असेल तर पांढऱ्या रंगाचा गुलाबा चांगला पर्याय आहे.

पांढरा गुलाब हा साधेपणा, विनम्रता, शांती आणि मनातील चांगल्या गोष्टीचा प्रतिक मानला जातो.

पिंक गुलाब – कृतज्ञता व्यक्त करणे

पिंक गुलाब हा समोरच्या व्यक्तीप्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.

व्हॅलेंटाइन डे हा केवळ पार्टनरसोबत प्रेम करण्यासाठी नसतो. तुम्ही आई, वडील, शिक्षक, भाऊ, बहीण, मित्र-मैत्रिणी यांच्या विषयीही प्रेम व्यक्त करू शकता.

लॅवेंडर गुलाब – प्रेम व्यक्त करणे

जर तुम्हांला एकतर्फी प्रेम झाले असेल, तर तुम्ही हा गुलाब देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

या रंगाचा गुलाब सहजपणे मिळत नाही. यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.