Thu. Mar 4th, 2021

Lovers साठी नव्हे, मावळच्या शेतकऱ्यांसाठी Valentine’s Day असणार खास, कारण…

प्रेमाचं प्रतीक असलेला गुलाब व्हॅलेन्टाईन डे (Valentine’s day) च्या तोंडावर महागणार आहे. प्रेम व्यक्त करण्याचा अविभाज्य भाग बनलेला गुलाब यंदा प्रेमवीरांपेक्षा (Roses on Valentine’s day) शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जाणार आहे. बदलत्या हवामानाचा फटका गुलाब उत्पादनावर झाला आहे. तरी उत्पादन कमी आणि मागणी मोठी असल्याने भारत वगळता इतर सर्व देशात मात्र मावळातील गुलाबाचा सुगंध दरवळणार आहे.

प्रेमाचं प्रतीक मानला जाणारा गुलाब सर्वच देशात यंदा स्थिरावला असताना भारतातील प्रेमीयुगलांच्या खिशाला मात्र कात्री लावणार आहे. व्हॅलेंटाईन डे संपताच लग्नसराई (Wedding Season) असल्यानं देशात गुलाब कमी पडेल म्हणूनच एका गुलाबामागे पाच ते दहा रुपये जास्त मोजावे लागणारेत.

व्हॅलेंटाईन दिवशी जगभरातील प्रेमवीरांच्या हातात असणारा गुलाब हा पिंपरी-चिंचवडच्या मावळातला. मावळ तालुक्यातील शेतकरी सव्वा दोनशे हेक्टर वरील शेतीवर गुलाब पिकवतात. तोच गुलाब आता निर्यातीस सज्ज झालाय. (Rose Farming)

बागायती पेक्षा गुलाब शेतीत शेतकरी लाखो रुपयांत खेळू लागले. हे पाहून कृषी क्षेत्रात पदवी मिळवलेले आणि हजारो रुपयांमध्ये नोकरी करणाऱ्यांनी यात झेप घेतली. ते सध्या यशस्वी झालेत. त्यांच नोकरीपेक्षा मिळणारं उत्पन्न हे केवळ दुपटीने नव्हे तर दहा पटीनं वाढलंय.

1991 पासून टाटांनी (Tata) गुलाबाची परदेशात निर्यात करायला सुरुवात केली.

2000 सालच्या सुरुवातीला निर्यातीवर संक्रांत आली, परिणामी गुलाब शेती डगमगली.

पण अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या जोरावर गुलाब शेतीने भरारी घेतली आहे.

जाानेवारी अखेर अन् फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुलाबाची निर्यात ठरलेली असतो.

यंदा परदेशातून दहा टक्के अधिकची मागणी वाढल्याने साहजिकच देशात गुलाब कमी पडणार. त्यातच व्हॅलेंटाईन डे संपताच लग्नसराई सुरू होतेय. हे पाहता मावळातल्या शेतकऱ्यांचा व्हॅलेंटाईन हा सुगीचा महिना असेल. मात्र देशी प्रेमीयुगलांच्या खिशाला झळ देणारा ठरणार आहे.

गुलाबाचं माहेरघर असलेल्या मावळात अनेक स्वदेशी कंपन्या गुलाबाचं उत्पादन करतात आणि या शेतकऱ्यांची फुलं परदेशात निर्यात करण्यासाठी हातभार लावतात. त्यामुळे मावळातील शेतकरी जगलाय. परंतु अवकाळी पाऊस, हवामानातील आर्द्रता यांमुळे फुलं उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. तरी शेतकरी राजा मात्र डगमगला नाही हे ही तितकंच खरं आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *