Fri. Dec 3rd, 2021

रॉस टेलरचं शतक, न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा ४ विकेटने पराभव

न्यूझीलंडने वनडे सीरिजची विजय सुरुवात केली आहे. न्यूझीलंडच्या अनुभवी रॉस टेलरने केलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा पहिल्या वनडेमध्ये  ४ विकेटने विजय झाला आहे.

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी ३४८ धावांचे तगडे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने हे विजयी आव्हान ६ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. 

न्यूझीलंडकडून सर्वाधिक नाबाद  १०९ धावा रॉस टेलरने केल्या. तर  हेनरी निकोल्सने ७८ तर कॅप्टन टॉम लॅथनने ६९ धावा केल्या.

टीम इंडियाच्या बॉलर्सना ३४८ धावांच आव्हान राखण्यास अपयश आलं. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने २ तर  मोहम्मद शमी आणि  शार्दूल ठाकूर या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.

याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅंटिगसाठी भाग पाडले.  टीम इंडियाची आश्वासक सुरुवात झाली.

मुंबईकर श्रेयस अय्यरने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक झलकावलं. अय्यरने  १०३ धावा केल्या. यात त्याने  ११ फोर आणि १ सिक्स लगावलं.

या खालोखाल कॅप्टन विराट कोहली आणि  लोकेश राहुल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. विराटने ५१ धावा केल्या. तर केएल राहुलने  नाबाद ८८ धावा केल्या.

दरम्यान या विजयामुळे न्यूझीलंडने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरी वनडे मॅच जिंकावी लागणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरी वनडे ८ फेब्रुवारीला इडन पार्कस येथे खेळण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *