Thu. Jul 9th, 2020

न्यूझीलंडच्या रॉस टेलरचा विक्रम, ठरला तिसरा खेळाडू

टीम इंडियाने न्यूझीलंडचा ७ धावांनी पराभव करुन ५-० च्या फरकाने टी-२० मालिका जिंकली. टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हॉईटवॉश दिला.

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचं पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक 53 धावा केल्या.

रॉस टेलरने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याला यश आलं नाही.

दरम्यान रॉस टेलरने टीम इंडिया विरुद्धच्या पाचव्या टी-२० मॅचमध्ये एक रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड करणारा रॉस टेलर हा न्यूझीलंडचा पहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा खेळाडू ठरला आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या ५ वी टी-२० खेळायला उतरताच रॉसने हा रेकॉर्ड केला.

काय आहे रेकॉर्ड ?

रॉस टेलरचा टीम इंडिया विरुद्धचा पाचवा- टी-२० सामना हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा सामना ठरला. टी-२० मध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याची कामगिरी करणारा रॉस टेलर हा तिसरा खेळाडू ठरला आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक मॅच खेळण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. शोएब मलिकने टी-२० मध्ये सर्वाधिक म्हणजेच ११३ सामने खेळले आहेत. या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहितने १०८ सामने खेळले आहेत.

सर्वाधिक टी-२० मॅच खेळणारे खेळाडू

शोएब मलिक – 113
रोहित शर्मा – 108*
रॉस टेलर – 100*
शाहिद अफरीदी – 99
एमएस धोनी – 98

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *