सरसंघचालक मोहन भागवतांना ध्वजारोहण करण्यापासून रोखले
वृत्तसंस्था, केरळ
सरसंघचालक मोहन भागवत यांना केरळमध्ये ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आलं होते.
एखादी राजकिय व्यक्ती शालेत ध्वजावंदन करू शकत नाही असं म्हणत पल्लकडच्या जिल्हाधिकाऱयांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना झेंडावंदनापासून रोखलं होते.
मात्र, शाळा प्रशासनाने मध्यस्थी केल्याने मोहन भागवत यांना झेंडा वंदनाची परवानगी देण्यात आली.
ध्वजारोहणासाठी मोहन भागवत यांन शाळा प्रशासनानेच आमंत्रण दिल्याचं सांगण्यात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोहन भागवत यांना झेंडावंदन करण्याची परवानगी
दिली.