Fri. Apr 23rd, 2021

चालत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणं बेतलं जीवावर

रेल्वे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवसे वाढत आहे. त्याचबरोबर तरूणांमध्ये स्टंटबाजी करण्याचे वेड आहे. या वेडामुळे अनेक जणांना जीवाला मुकावे लागले आहे.

नुकताच दिवा – मुंब्रा दरम्यान लोकल ट्रेन मध्ये स्टंट करत असताना खांबावर आपटून वीस वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

या तरूणाचे नाव दिलशान्त खान असून तो कल्याणमधील रहिवासी आहे. स्टंट करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

प्रवासादम्यान स्टंट करत असताना रेल्वे पटरीला असलेल्या पोलाची धडक लागून तो रेल्वे डब्यात पडला. जखमी अवस्थेत रूग्णालयात भरती केले असता उपचारांदरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.

दिलशान्त हा कल्याणहुन मुंबईला मित्रासह खरेदीसाठी जात होता.

हा 20 वर्षीय तरुण रुग्णवाहिकेचा चालक असल्याचे कळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *