Tue. Apr 20th, 2021

‘बाहुबली थाळी’पेक्षाही मोठी ‘साहो थाळी’!

ही थाळी एक नव्हे, तर 5 ते 6 जणांनाही सहज संपणार नाही एवढी मोठी आणि भरपूर असते. या थाळीत अनेक भाज्या, भात, पोळ्या आणि इतरही अनेक पदार्थ असतात. या थाळीत एकूण 30 पदार्थ असतात.

बाहुबलीच्या तुफान यशानंतर प्रभासचा ‘साहो’ आता बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतोय. ‘बाहुबली’ सारखा नसला, तरी हा सिनेमाही चांगलाच भव्यदिव्य आहे. बाहुबली प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाहुबलीच्या नावाची थाळी प्रसिद्धीस आली. अनेक पदार्थांचं एका माणसाला सहज न संपणारं जेवण हे बाहुबलीचं वैशिष्ट्य आहे. मात्र आता प्रभासचा ‘साहो’ सिनेमा गाजत असल्यामुळे आता नवी ‘साहो थाळी’ सुद्धा खवय्यांसाठी तयार करण्यात आली आहे.

हे ही वाचा- खवय्यांसाठी खास ‘सतरंगी थाळी’!

साहो थाळी ही आशिष महेश्वरी यांच्या हॉटेलमधील सर्वांत मोठी थाळी आहे. ही थाळी एक नव्हे, तर 5 ते 6 जणांनाही सहज संपणार नाही एवढी मोठी आणि भरपूर असते. या थाळीत अनेक भाज्या, भात, पोळ्या आणि इतरही अनेक पदार्थ असतात. या थाळीत एकूण 30 पदार्थ असतात.

काय असतं ‘साहो थाळी’मध्ये?

व्हेज कोल्हापुरी,

भेंडी दहीवाला,

राजस्थानी कढी,

बाजरीची बाकरी,

केशर पुलाव,

स्टीम राईस,

खिचडी,

डाळ,

अशा पदार्थांची रेलचेल असते.

याबरोबरच डेझर्टमध्ये खीर, वेलची श्रीखंड असे गोड पदार्थ असतात.

याशिवाय दाल पकवान, रिंग ढोकळा, इंदौरी समोसा हे पदार्थही या थाळीत खायला मिळतात. विशेष म्हणजे दर दिवशी बदलून वेगवेगळे 30 पदार्थ या थाळीत चाखायला मिळतात.

हे ही वाचा- थाळीला मतदानाचा रंग, ‘चौकीदार पराठा’ आणि ‘इलेक्शन थाळी’ खमंग!

प्रभासची प्रतिक्रिया!

प्रभासला जेव्हा या ‘साहो थाळी’बद्दल कळलं, तेव्हा त्याला आनंद झाला. त्याने स्वतः जरी ही थाळी खाल्ली नसली, तरी आपल्या सिनेमाच्या नावावरून चाहत्यांमध्ये अशी थाळी लोकप्रिय होत आहे, ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं त्याने म्हटलंय. ‘साहो’ सिनेमाला फॅन्स जसा प्रतिसाद देतायत, तसाच प्रतिसाद या ‘साहो थाळी’लाही मिळो, अशी सदिच्छा त्याने व्यक्त केलीय.

हे ही वाचा- ‘इथे’ मिळतं स्वस्तात जेवण, पण त्यासाठी आहे एक ‘सुंदर’ अट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *