Wed. Dec 11th, 2019

आरोपी सचिन अंदुरेची कोठडी संपली, पुन्हा कोर्टात हजेरी…

 

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येतील आरोपी सचिन अंदुरे याची आज सीबीआय कोठडी संपत असल्याने आज त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याच दरम्यान गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी अमोल देगवेकर आणि राजेश बंगेरा यांना सुद्धा सीबीआयने कर्नाटक एसआयटी कडून नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी ताब्यात घेतलेले आहे. त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात येईल. 

मात्र एक आरोपी अमोल काळेला कलबुर्गी हत्या प्रकरणात वर्ग केल्याने त्याचा ताबा सीबीआयला मिळालेला नाही. त्यामुळे आज सचिन अंदुरे, अमोल देगवेकर आणि राजेश बंगेरा या तिघांना हजर केलं जाणार आहे.

गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा थेट संबंध काय आहे याबाबत कोर्टात नवीन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यांना अकराच्या नंतर हजर करण्यात येईल अशी माहिती मिळतेय. त्यामुळे सीबीआय आज काय नवीन माहिती देत हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत वाढ, यासंदर्भात होणार चोकशी

डाॅ. दाभोळकर हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात…

डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आता अंनिस पुढाकार घेणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *