Sat. Aug 13th, 2022

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. सारा तेंडुलकरने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा कपड्यांच्या ब्रॅंडची जाहिरात करताना दिसत आहे.

सारा तेंडुलकरने सामायिक केलेला व्हिडिओ काही क्षणातच सोशल मिडियावर व्हायरल झाला. सारा तेंडुलकर सोशल मिडियावर खूप ऍक्टिव्ह असते. सारा सतत इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ सामायिक करत असते. दरम्यान साराने एक व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा कपड्याची जाहिरात करताना दिसत आहे.

सारा तेंडुलकरने सामायिक केलेल्या व्हिडिओमध्ये सारासोबत अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी, भारतीय आणि ब्रिटीश अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफ दिसत आहेत. साराने सामायिक केलेला व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला असून अनेकांनी साराच्या व्हिडिओला पसंती  दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.