Sat. Oct 24th, 2020

ये दोस्ती हम नही तोडेंगे; दुरावा संपून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमध्ये पून्हा मैत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणा-या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमधील दुरावा कमी झाल्याचं आता दिसुन येत आहे.  याबद्दल खुद्द विनोद कांबळीनेच माहिती दिलीये.

‘आमच्यात सर्व काही ठीक आहे. यासाठी मी आनंदी आहे. आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली आणि बातचीत केली’ असं विनोद कांबळीने ट्विट करुन सांगितलंय.

तसेच ‘जे काही झालं होतं, ते सर्व आमच्यात होतं. आमच्या नव्या मैत्रीमुळे मी प्रचंड आनंदी आहे’. अश्या भावनाही विनोद कांबळीने व्यक्त केल्यायेत.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रसी : द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. यावेळी दोघांनी मनसोक्त गप्पाही मारल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *