Tue. Nov 24th, 2020

करकरेंच्या मृत्यूनंतर माझं सुतक संपलं – साध्वी प्रज्ञासिंह

भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझा दोष नसताना हेमंत करकरे यांनी मला तुरूंगात ठेवले. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह आहे आणि तुमचा सर्वनाश होईल असा शाप मी दिला होता.ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले त्यादिवशी मी तुरूंगात असल्यापासूनचे माझं सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. ज्या पद्धतीनं कंसाला मारुन श्रीकृष्णानं समाजाला वाचवलं तसाच मृत्यू हेमंत करकरेंना आला. असं ही त्या म्हणाल्या आहेत.साधू संताना त्रास देणाऱ्या काँग्रेसचं सरकार माझ्या शापामुळं गेलं असं विधान देखील त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वच स्तरावर साध्वी यांच्यावर टीका होत आहे.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह ?

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझा दोष नसताना हेमंत करकरे यांनी मला तुरूंगात ठेवले.

हेमंत करकरे यांनी मला खूप त्रास  देत मला शिवीगाळ केली आहे.

हा देशद्रोह आहे, धर्मद्रोह आहे आणि तुमचा सर्वनाश होईल असा शाप मी  हेमंत करकरे यांना दिला होता.

मी  करकरेंना दिलेल्या शापामुळं त्यांना 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मारलं.

माझा छळ केल्यानंतर फक्त सव्वा महिन्यात करकरेंना मारण्यात आलं .

ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले त्यादिवशी मी तुरूंगात असल्यापासूनचे माझं सुतक संपले.

ज्या पद्धतीनं कंसाला मारुन श्रीकृष्णानं समाजाला वाचवलं तसाच मृत्यू हेमंत करकरेंना आला.

साधू संताना त्रास देणाऱ्या काँग्रेसचं सरकार माझ्या शापामुळं गेलं असं विधान देखील त्यांनी केलं आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी  हेमंत करकरे यांनी साध्वी यांना अटक केली होती.

याचाच राग साध्वी यांच्या मनात असल्याने त्यांनी असं वक्तव्य केलं आहे असं म्हटलं जात आहे

शहीद हेमंत करकरे यांच्यावर असं वक्तव्य केल्याने सर्वचं स्तरातून त्यांचा निषेध होत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *