Fri. Dec 3rd, 2021

डॉक्टरने मृतदेहावर दोन दिवस केले उपचार

सांगली : मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. वाठारकर याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

रुग्ण सायरा शेख यांचा आधार हेल्थ केअर मध्ये उपचारादरम्यान ८ मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. मृत्यु प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू आठ मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र डॉक्टरांनी मृतदेह १० मार्चला ताब्यात दिला. यामुळे नेमके काय ? ही परिस्थिती नातेवाईकांनी जाणून घेत डॉक्टर विरोधात तक्रार केली होती. आणि या प्रकरणी पाठपुरावा केला होता. सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करत मृतदेहाची विटंबना केल्याचे अखेर बिंग फुटले. आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी डॉ. वाठारकरला अटक करण्यात अली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *