Tue. Nov 24th, 2020

#EarthDay : सई ताम्हणकर करणार श्रमदान

जागतिक वसुंधरा दिन जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे.यामध्ये सेलिब्रिटी देखील सहभाग घेत आहे. महाराष्ट्रात सध्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदान केले गेले. अभिनेत्री सई ताम्हणकरने जागतिक वसुंधरा दिनी चाहत्यांना श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ मे रोजी सई ताम्हणकर श्रमदान करण्यास जाणार आहे. तसेच तिने आपल्या चाहत्यांनाही श्रमदानाचे महत्व पटवून देणारा एक व्हिडीयो सोशल मीडियावरून अपलोड केला आहे. पाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र पाणी टंचाई विरहित करण्यासाठी योगदान देणारी सजग अभिनेत्री सई ताम्हणकर यंदाही महाराष्ट्र दिनी श्रमदान करणार आहे. सेलिब्रिटी देखील आपापल्या परीने महाराष्ट्रात वसुंधरा दिन साजरा करत आहेत.

सई ताम्हणकर करणार श्रमदान

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अभिनेत्री सई ताम्हणकर श्रमदान करणार आहे

आपल्या चाहत्यांना सुद्धा मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे.

१ में रोजी सई ताम्हणकर श्रमदान करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे

सईने महाराष्ट्रातील नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे.

श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष असून सई न चुकता दरवर्षी महाश्रमदानात हिस्सा घेते.

पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाशिवाय वर्षभर होणा-या कार्यक्रमांनाही सई आवर्जून सहभागी होते.

 

 

 

चाहत्यांना श्रमदान करण्याचे आवाहन

“पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणा-या गुराढोरांसाठी,

पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी,

डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणा-या बायकांसाठी, आणि करपणा-या शेतांसाठी

मी ह्या महाराष्ट्र दिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे.

मी माझ्या पध्दतीने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही सहभागी व्हा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *