Jaimaharashtra news

गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या झोळीत भक्तांनी अर्पण केली कोट्यवधींची गुरुदक्षिणा

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या झोळीत भक्तांनी कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण केली.

 

साईचरणी तब्बल 5 कोटी 52 लाखांचं दान जमा झाले. दानपेटीत 3 कोटी रुपये आहेत. डोनेशन काऊंटवर 1 कोटी, तर चेक, डीडी आणि ऑनलाईन डोनेशनच्या

माध्यमातून 1 कोटीचं दान साईबाबांच्या झोळीत जमा झाले.

 

साईचरणी दान कोणकोणत्या स्वरुपात पडलं 

 

– देणगी काऊंटरवर 1 कोटी 4 लाख 9 हजार रु

– हुंडीत 2 कोटी 94 लाख 3218 रुपये

– सव्वा दोन किलो सोन्याचं दान

– साडे आठ किलो चांदी

– 20 देशांचं 10 लाख रुपये किमतीच परकिय चलन

– 1920 साली सुरु झालेल्या साईसंस्थानच्या खात्यामध्ये 1600 रुपये होते.

– आज साई संस्थानकडे 1800 कोटी रुपये आहेत.

– यामध्ये 460 किलो सोनं 4500 किलो चांदीचा समावेश आहे.

Exit mobile version