Fri. Mar 5th, 2021

सायना नेहवालला ‘Indonesia masters’चं विजेतेपद

सायना नेहवालला ‘Indonesia masters’च्या महिला एकेरीचे विजेते पद मिळाले आहे. दुखापतग्रस्त कॅरोलिना मारिनने फायनलमधून माघार घेतल्यामुळे सायनाला विजेते पद मिळाले.

सायना शनिवारी प्रजासत्ताकदिना दिवशी सेमीफायनलचा सामना जिंकून ‘Indonesia masters’ बॅडमिंटन टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत गेली  होती.

आज म्हणजेच रविवारी कॅरोलिना मारिन विरोधात फायनल सामना होणार होता. परंतु त्याआधीच मारिनने माघार घेतल्याने सायनाला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

सेमीफायनलमध्ये सायनाने चीनच्या बिंगजियाओचा 18-21, 21-12, 21-18 असा पराभव करीत फायनलमध्ये गेली होती. 58 मिनिटांपर्यंत चालू असलेल्या या सामन्यात सायनाने विजय मिळवला होता.

सायनाचा बिंगजियोआ विरोधात करिअरमधील पहिला सामना होता. सायना नेहवाल आणि कॅरोलिना मारिन या दोघी 11 वेळेस एकमेकींसमोर उभ्या राहील्या होत्या.

यात 5 वेळेस सायनाला विजय मिळवता आला तर 6 वेळेस मारिनचा विजय झाला आहे. सायनाने गेल्यावर्षी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि आशियाई गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.

तसेच डेन्मार्क, इंडोनेशिया मास्टर्स आणि सय्यद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचण्यात सायनला यश आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *