‘१९६२- द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्ये परश्या झळकणार…
‘सैराट.’चित्रपटातील परश्या पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला….

सैराट चित्रपटात परश्या आणि आर्ची आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. ‘सैराट’ चित्रपटात परश्याची भूमिका अभिनेता आकाश ठोसरने साकारली होती. सैराट या चित्रपटामुळे आर्ची आणि परश्याला प्रचंड प्रसिद्ध मिळाली.
या चित्रपटातील गाणे हे प्रेक्षकांच्या मनावर इतके भिडले की, सैराट चित्रपट रिलीज होऊन झाल्यानंतर पण हेच गाणे अनेक कार्यक्रमात वाजली जातं होती. आता आकाश एका नव्या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘१९६२- द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन अभिनेते, महेश मांजरेकर केलं आहे. या सीरिजमध्ये आकाश एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
आकाश या वेब सीरिजमध्ये सैनिकाच्या भूमिकेत झळकणार आहे शिवाय आकाशने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सीरिजमधील लूकचा फोटो शेअर केला आहे. ‘१९६२- द वॉर इन द हिल्स’ या सीरिजमध्ये आकाशसोबत अभिनेता अभय देओल, सुमित व्यास हे मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे तर ही सीरिज २६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.