Fri. Dec 3rd, 2021

रिंकू राजगुरू देणार बारावीची परीक्षा; महाविद्यालयाकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता 12 वीची परीक्षा गुरुवार, 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

सैराट सिनेमातून आपल्या हटके डायलॉगबाजीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी आर्ची उर्फ रिंकू अर्थात, प्रेरणा महादेव राजगुरू ही देखील यंदा बारावीची परीक्षा देणार आहे.

तिच्या परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संबंधित महाविद्यालयाने केली आहे.

रिंकू ही टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार आहे.

तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होण्याची व त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.

तसे पत्रच त्यांनी पोलीस ठाण्याला लिहिले आहे.

रिंकू बहिःस्थ विध्यार्थी म्हणून बारावीची परीक्षा देत आहे.

मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांचे पेपर ती देणार असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी तिने दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती. या परीक्षेत ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *