Thu. Mar 4th, 2021

पत्रकारास मारहाण प्रकरणी सलमान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

बॅालीवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान आणि त्याच्या बॅाडीगार्डच्या विरोधात  महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

बॅालीवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान आणि त्याच्या बॅाडीगार्डच्या विरोधात  महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.  दरोडा, हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी पांडेनी  केली आहे. सलमान सायकल चालवत असताना अशोक पांडेंनी व्हिडिओ बनवल्याच्या रागातून ही घटना घडली आहे.

 

नेमकं काय घडलं ?

डी एन नगर परिसरात सायकल चालवत असताना कोणीतरी पाठलाग करत असल्याचे सलमानच्या लक्षात आले.

पाठलाग करणारी व्यक्ती जवळपास 15 ते 20 मिनीटे पाठलाग करत सलमानचा व्हिडिओ बनवत होती.

खूप वेळापासून  व्हिडिओ बनवत असल्याने सलमानला राग आला. रागाच्या भरात सलमान आणि त्याच्या बॅाडीगार्डने त्या व्यक्तीचा फोन हिसकावून घेतला.

इतकेच नाही तर शिविगाळ केल्याचे त्या व्यक्तीने आरोप केले आहे. पाठलाग करणाऱ्या व्यक्तीचे नाव अशोक पांडे असे होते.

याप्रकरणी  पत्रकार  पांडे यांनी सलमानविरोधात मारहाण आणि दरोड्याची डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

परंतु, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली जात नसल्याने पांडेंनी सरळ महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे.

दिलेल्या तक्रारीत सलमान आणि त्याच्या बॅाडीगार्ड वर दरोडा, हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

सलमान आणि त्याच्या बॅाडीगार्ड शेराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी 12 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती पांड्ये यांचे वकील नीरज गुप्ता आणि निशा आरोरा यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *