…म्हणून सलमानच्या डोक्यावर आहे इतक्या पैशांची उधारी

कोट्यावधीच्या संपत्तीची मालकी असलेला अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. अनेक भुमिकांमधून त्याने चाहत्याची मन जिंकली आहेत. नेहमी सर्वांच्या मदतीला धावणारा असा उत्तम माणूस म्हणून नेहमीच सलमानची ओळख राहिली आहे.
अशा या सलमानच्या डोक्यावर बऱ्याच वर्षांपासून पैशांची उधारी आहे. असे सलमानने एका कार्यक्रमात सांगितले आहे
काय म्हणाला सलमान खान?
उमंग या कार्यक्रमात बोलताना सलमान खानने या गोष्टीचा खुलासा केला आहे. मी तेव्हा शॉर्टस घातले होते. त्यामुळे माझ्या कडे पैसेही नव्हते. मी सायकल घेऊन मॅकेनिककडे गेलो आणि त्याला सायकल नीट करायला सांगिलती.
पैसे नंतर देतो असं सांगितलं .त्यावर वर दुकानदाराने मला सांगितले की,लहानपणीही तु ही असंच करायचा. याआधीही तु सायकल रिपेरिंग करायला आला होतास त्याचे पैसे अजूनही दिलेले नाहीस. माझ्याकडे अजून तुझे सव्वा रूपये उधार आहेत.
दुकानदाराच्या बोलण्याने सलमान गप्प झाला. त्याने पैसे दुकानदाराला पैसे दिले पण त्याने घेतले नाहीत.
यामुळे सलमान ते मॅकेनिकचे सव्वा रूपये अजूनही उधारी म्हणून समजतो. असे त्याने यावेळी स्पष्ट केले.