Tue. Nov 24th, 2020

कर्नाटक सरकारला बाहुबलीचा ट्रेलर तरी दाखवा- शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून बेळगावच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आलं आहे. सध्या बेळगावात जय महाराष्ट्र या घोषणेचा वाद चांगलाच पेटला आहे.

 

त्यातच जीएसटी विधेयकावरुन विधीमंडळात बाहुबलीचे पार्ट वन पार्ट टू यावर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हाच धागा पकडून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. बेळगावातील मुद्द्याला हात घालण्याची विनंती सामनातील अग्रलेखातून केली आहे.

 

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-

 

सध्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना ‘बाहुबली’ आणि ‘कटप्पा यांच्यात भलताच रस वाटत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपण ‘बाहुबली पार्ट टू’ दाखवायला तयार आहोत, असे आव्हान राजकीय विरोधकांना दिले आहे.

 

हा जो काही ‘बाहुबली पार्ट टू’ आहे तो तुम्ही दाखवायचा तेव्हा दाखवाच, पण आधी मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या कर्नाटक सरकारला बाहुबलीचा निदान ट्रेलर तरी दाखवा एवढी आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे.

 

कर्नाटकचा एक भ्रष्ट आणि बकवास मंत्री रोशन बेग याने धमकी दिली आहे की, सीमा भागात निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. तसा कायदा विधानसभेत आणण्याचे नक्की झाले आहे.

 

अन्य राज्यांचा जयजयकार करणे हा घटनात्मकदृष्ट्य़ा गुन्हा कसा ठरू शकतो? कर्नाटकातील या कानडी वरवंट्य़ाची दखल महाराष्ट्राचे सरकार आता तरी घेणार आहे काय? रोशन बेगसारख्या नादान माणसाची लुंगी उतरवून त्याची डीएनए चाचणी करायलाच हवी.

 

त्यांच्या अंगात स्वच्छ स्वदेशी रक्त असूच शकत नाही. पण महाराष्ट्र त्यांच्या छाताडावर बसून ‘जय महाराष्ट्र’चा गजर केल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *